महायुती लोकसभेसाठी सज्ज : अशा असणार तिन्ही पक्षांना जागा !
बातमीदार \ २६ नोव्हेबर २०२३
देशात आगामी काळातील लोकसभा निवडणुकी जंगी तयारी सर्वच पक्षांनी केली आहे. तर राज्यात देखील या निवडणुकीसाठी नेत्यांनी लोकसभा मतदार संघानिहाय चाचपणी करीत असतांत आता महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर शिंदे गट आणि अजित पवार गट 22 जागा लढवणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, लोकभेच्या 48 जागांबाबत तीनही पक्षांचे जवळपास एकमत झाले आहे. जिंकणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल मात्र हा शब्द अंतिम शब्द नसेल, असेही ते म्हणाले. शिंदे गट आणि अजित पवार गट 22 जागा एकत्रीत लढवतील असेही ते म्हणाले.महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये कुणाला किती जागा मिळणार, याबाबत तर्क लढवले जात होते. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा केला आहे. शिवसेना आणि अजित पवार गटाला हे जागावाटप मान्य असेल का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीचा आणि भाजपचा वेगळा सर्व्हे झालेला आहे. त्यातून महायुतीला अंदाज आलेला असून ज्या जागा भाजप जिंकू शकते त्या जागांवर भाजप लढणार आहे. केंद्रात सरकार निवडून आणण्यासाठी महायुतीकडून ताकद लावण्यात येणार आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटेल असेही त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू आहे. यावरही फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. या बातम्यांमध्ये तथ्या नसून मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. नागपूरमधील माझ्या पारंपारिक मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम