मला मुख्यमंत्री करा ; संभाजीराजे छत्रपतींचा व्हिडीओ व्हायरल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ नोव्हेबर २०२३

राज्यात गेल्या काही महिन्यापासून अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे या आशयाचे होर्डीग मोठ्या संख्येने झळकल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. मला मुख्यमंत्री करा. त्यानंतर मी तुमचे प्रश्न एका चुटकीत सोडवतो, असे ते या व्हिडिओत म्हणताना दिसून येत आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.

कोल्हापुरात सारथीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या निमित्ताने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच त्यांचे प्रश्न योग्य त्या व्यासपीठावर मांडण्याची हमीही दिली. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी आमचे प्रश्न सुटले की, आम्ही आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका घेतली. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी हसत ‘मला मुख्यमंत्री करा, त्यानंतर मी तुमचे प्रश्न चुकटीत सोडवतो’, अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या विधानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

फेलोशिप विद्यार्थी तसेच सारथी कृती समिती कोल्हापूर विभागाच्या प्राध्यापकांनी सारथी संशोधन फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी, पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देऊन आर्थिक नुकसान टाळावे आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. संभाजीराजे यांनी रविवारी या आंदोलकांना भेट दिली. यावेळी आंदोलकांनी त्यांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यावर संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा समाजाचे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असे विधान केले. तसेच या कामाचा पाठपुरावा करण्याची हमीही दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम