ठाकरे परिवारात राऊतांनी भांडणे लावली !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ नोव्हेबर २०२३

राज्यातील भाजपचे नेते व संजय राऊत यांचे कट्टर विरोधक आ.नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सोमवारी खा.संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी ठाकरे घराण्यात भांडणे लावली. यामुळेच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली होती, असे ते म्हणालेत.

संजय राऊत यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपवर पक्षात फूट पाडून राज्य करण्याचे धोरण राबवल्याचा आरोप केला होता. नितेश राणे यांनी त्यांच्या या टीकेला तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी अशी अश्लील भाषा वापरताना त्यांना लाज वाटली नाही का? सध्या त्यांचा पगार 10 जनपथवरून होतो. वेणूगोपाल धूत यांच्याकडूनही त्यांना पगार मिळतो. ही माहिती खोटी असेल तर त्यांनी ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शपथीवर सांगावे.

नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांनी ठाकरे घराण्यात ज्या काही काड्या व भांडणे लावली. त्यांनी पवार कुटुंबातही काड्या लावण्याचे काम केले. त्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली, तर कुणी त्यांना घरातही उभे करणार नाही. राऊत यांनी ठाकरे घराण्यात भांडण लावले. यामुळेच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या गाडीवर हल्ला केला होता, असा आरोपही नितेश राणे यावेळी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम