मंगळग्रह सेवा संस्था, मानिनी फाऊंडेशन तर्फे रविवारी महिला शेतकरी संवाद

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख)

येथील मंगळग्रह सेवा संस्था व मानिनी फाऊंडेशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत खास शेतकरी बांधव तसेच महिला शेतक-यांसाठी संवाद कार्यक्रम होणार आहे.

खानदेश बांबू प्रोड्युसर कंपनीचे उमेश सोनार ‘बांबू प्रोजेक्ट, जळगावचे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ दिलीप पाटील- ‘नैसर्गिक सेंद्रिय शेती’, शास्त्रीय कृषी विज्ञान केंद्र, जळगावचेच तुषार गोरे- ‘शेती प्रक्रिया उद्योग’, संकल्प एच. आर. डी. कॉर्पोरेशन, पुणे येथील डॉ. पी. एन. कदम- ‘शेती उत्पादने ब्रांडिंग आणि पॅकेजिंग’, रोमीफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रशांत नायकवाडी- ‘सेंद्रिय अवशेषमुक्त शेती’, तर आंतरराष्ट्रीय योगतज्ज्ञ डॉ. अनिता पाटील- कॅन्सर योग थेरेपी’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या या शेतकरी संवाद तथा मार्गदर्शनपर शिबिराचा महिला शेतक-यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम