अमळनेर तालुक्यातील दोन शाळांना शिक्षणाधकारी यांची सदिच्छा भेट.

बातमी शेअर करा...

(प्रतिनिधी)माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी तालुक्यातील दोन शाळांची चौकशी केली तर मंगरूळ शाळेला सदिच्छा भेट दिली.
सानेगुरुजी व लोकमान्य शाळांच्या तपासणीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव अमळनेर तालुक्यात आले होते. दोन्ही शाळांची तपासणी करून शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मंगरूळ येथील स्व अनिल अंबर पाटील माध्यमिक शाळेला सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या अध्यक्ष सुहासिनी पाटील ,मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी शिक्षणाधिकारी बच्छाव यांचे शाल बुके देऊन स्वागत केले. त्यांनंतर बच्छाव यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित शिक्षकांना जादा तासिका ,गुणवत्ता ,बदलती शैक्षणिक धोरणे , शालेय रेकॉर्ड याबाबत मार्गदशन केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील ,जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभूदास पाटील , माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील , सानेगुरुजी पतपेढीचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील , सुषमा सोनवणे , शीतल चव्हाण ,प्रवीण पाटील ,राहुल पाटील ,मनोज पाटील , सुदर्शन पवार , खुशाल पाटील हजर होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम