मनोज जरांगे पाटलांचा सरकारला संतप्त सवाल !
बातमीदार | २५ नोव्हेबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे व सभा घेत आहे. याच्या दौऱ्यांना मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे, गेल्या काही दिवसापासून मनोज पाटील व ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मनोज पाटलांनी सरकारवर टीका केली आहे.
मनोज पाटील म्हणाले कि, जालन्याच्या आंतरवाली सराटीतील पोलिसांवरील दगडफेकीप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारने आमच्या काही लोकांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेचे कारण काय? सरकारचा यामागे कोणता डाव आहे? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी सरकारला केला आहे.
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत सुरू असणाऱ्या आंदोलनावेळी पोलिसांवर दगडफेक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. या प्रकरणी पोलिसांनी जालन्यातून 4 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी असणाऱ्या एका व्यक्तीकडे पिस्तुल व जिवंत काडतूसे सापडली आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सरकारने आंतरवाली कार्यकर्त्यांना अटक करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मग आमच्या लोकांना अटक करण्याचे कारण काय? आमच्या लोकांना अटक करून आम्हाला बदनाम करण्याचा डाव सरकारने रचला आहे का? आमच्यावर अन्याय झाल्याचे सांगून तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करणार नाही, असे सरकारने सांगितले होते. पण आता आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. यामागे कोणता तरी डाव आहे हे स्पष्ट आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणी म्हटले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम