बातमीदार | २५ नोव्हेबर २०२३
१५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी लग्न करून पती-पत्नीसारखे संबंध ठेवणाऱ्या एका ४६ वर्षीय शिक्षकाला शुक्रवारी आंध्र प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. आरोपी शिक्षक आधीच दोन मुलींचा बाप आहे. त्याची पत्नी सात वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली आहे. गुरुवारी पोलिसांनी गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम जवळील यंदगानी जिल्हा परिषद हायस्कूलचा हिंदी शिक्षक के. सोमराजू याला प्रेमाच्या बहाण्याने तरुणीला फूस लावून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून ‘लग्न’ केल्याप्रकरणी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम गोदावरी जिल्हा दिशा (महिला सुरक्षा शाखा) च्या पोलिस मुलीसोबत चार महिने प्रेमाचे नाटक केले. तिला आपला स्मार्टफोनही दिला. काही दिवसांपूर्वी त्याने तिला तिच्या घरातून आपल्या घरी आणले आणि तिच्याशी लग्न केले. उपअधीक्षक एन. मुरली कृष्णा यांनी सांगितले की, की, आरोपी सोमराजूने अल्पवयीन मुलीशी फसवणूक करून लग्न केल्यानंतर सोमराजूने तिला काही दिवस जबरदस्तीने आपल्याजवळ ठेवले आणि पती-पत्नीसारखे संबंधही ठेवले. त्यानंतर मुलगी आरोपी शिक्षकाच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि यंदागंडी गावात तिच्या घरी परतत तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर इयत्ता १०वीच्या विद्यार्थिनीने तिच्या वडिलांसह पोलिसांकडे जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम