मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ ऑक्टोबर २०२३

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील चार दिवसापासून उपोषण सुरु केले आहे. मागील चार दिवसांपासून उपचार तर तीन दिवसांपासून पाणी बंद असल्याने श्री. जरांगे यांची प्रकृती ही खालावली आहे. शिवाय हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून रविवारपासून गावागावांत बेमुदत उपोषण करा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मराठा आरक्षणासाठी मागील ४४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू आहे. ता. २९ ऑगस्ट ते ता १४ सप्टेंबर दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केल्यानंतर मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी चाळीस दिवसांचा अवधी शासनाला दिला होता.

मात्र, मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्याने पुन्हा ता. २४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले. मागील चार दिवसांपासून श्री. जरांगे हे वैद्यकीय उपचारही घेत नाहीत. शिवाय तीन दिवसांपासून त्यांनी पाणी देखील बंद केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या, अशी भूमिका उपोषणकर्ते यांनी घेतल्याने बेमुदत उपोषण सुरू होऊन चार दिवस झाल्यानंतरही राज्य शासनाच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यांनी उपोषणकर्ते श्री. जरांगे यांच्याही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे उपोषणकर्ते अन् राज्य शासनाने ही तटस्थ असल्याने मार्ग निघत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.२७) जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी शासन आपल्या मागणीवर गांभीर्याने विचार करत आहे. आंदोलनाबाबत सविस्तर माहिती शासनाला दिली जात आहे, आपण तब्येतीची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ व पोलिस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी श्री. जरांगे यांना सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम