मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ ऑक्टोबर २०२३

राज्यातील प्रत्येक व्यक्ती रेल्वेने प्रवास करण्यास नेहमीच प्राधान्य देत असतो. पण सध्या याच रेल्वेत तांत्रिक बिघाडामुळे अनेक प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. कर्जत ते बदलापूर दरम्यानची लोकल सेवा खोळंबली आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कर्जत ते बदलापूर दरम्यानच्या तांत्रिक बिघाडामुळे बदलापूर ते मुंबई लोकल सेवा देखील उशिराने सुरु आहे. मुंबईहून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन बदलापूरपर्यंतच धावत आहे. रेल्वेची कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचं काम सुरु आहे. लवकरच दुरुस्ती करुन लोकल सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती सध्या मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम