मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ सप्टेंबर २०२३

तब्बल 16 दिवस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढी दीर्घ काळ उपवास केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार, तपासण्यांकरीता अंतरवाली सराटी येथून त्यांना रूग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये येताना मनोज जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी मराठा समाजाकडून स्वागतही करण्यात आले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची उपोषणादरम्यान उपोषण स्थळीदेखील वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. अशात शनिवारी (ता.16) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या सोबत फोनवर चर्चा केली. वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे, अशी विनंती केली होती. सुरूवातीला मी आंदोलनस्थळीच उपचार घेतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. मात्र, नंतर सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे अखेर ते आज रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री यांच्या विनंतीप्रमाणे आज जरांगे पाटील सकाळी अकरा वाजता अंतरवाली सराटी ता. अंबड येथून छत्रपती संभाजी नगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी रवाना झाले होते. उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांची तपासणी रुग्णालयात करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर सर्व चाचण्या करण्यात येणार आहे. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार केले जातील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम