मंत्री ‘बोलून झाले मोकळे’ ; नाना पटोलेनी घेतला समाचार !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ सप्टेंबर २०२३

दोन दिवसापासून छत्रपती संभाजी नगरात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आले. यावरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाड्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानाही तेथे दुष्काळ जाहीर न केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

शिंदे-फडणवीस मुंबईप्रमाणे छत्रपती संभाजीनगरातही ‘बोलून झाले मोकळे’ आणि मराठवाड्यातील जनतेच्या हाती आले फक्त भोपळे, असा टोला पटोलेंनी लगावला आहे. मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठक घेतली. पण, त्यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही.
५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा ढोल पिटला जात असला, तरी तो आकड्यांचा खेळ असून प्रत्यक्षात जनतेच्या हाती जेव्हा काही लागेल तेंव्हाच ते कळेल, अस म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम