मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली ; घटनास्थळी वैद्यकीय पथक दाखल !
बातमीदार | ६ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून आता मराठा आरक्षणासाठी मागील ९ दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान आज बुधवार मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांचे पथक आंदोलनस्थळ दाखल झाले आहे.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकार जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जरांगे यांच्या उपषोणाचा आज ९वा दिवस असून मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्याने. वैद्यकीय पथक उपोषनस्थळी दाखल झालं आहे. उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाणी पतळी कमी झाल्याने आज त्यांना सलाइन लावण्यात आले.
यापूर्वी राज्य सरकाच्या शिष्ठमंडळाकडून मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, एक महिन्याचा वेळ द्यावा,असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. मात्र एक महिन्याचा वेळ कशाला हवा? चार दिवसांची वेळ पुरेसा आहे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम