मनोज पाटलांचे सरकारला इशारा अखेरची मुदत २४ असणार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून जालना येथील मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी मोठी लढाई सुरु आहे. त्यांनी आता आपला मोर्चा पुणे जिल्ह्यात वळविला आहे. या सभेसाठी जरांगे यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं. त्यांनी थेट आता सरकारला इशारा दिला आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय आता गांभीर्याने घ्यावा. येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. चालढकल करण्याचा प्रयत्न केला, तर मराठ्यांचं शांततेत सुरू असलेलं आंदोलन तुम्हाला पेलणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आता राज्यभरात सभा घेत आहेत. या सभेतून ते राज्य सरकारकडे वारंवार आरक्षणाची मागणी करीत आहेत. आज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील खेड आणि बारामती तालुक्यात जंगी सभा होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम