मनोज पाटलांचा मंत्री दानवे यांच्यावर हल्लाबोल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० नोव्हेबर २०२३

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली असून आज पुण्यातील खराडी परिसरात मनोज जरांगे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.

पाटील म्हणाले कि, मराठ्यांनी ठरवलं तर तुमच्या अंगाला आयुष्यभर गुलाल लागणार नाही, तुम्हाला राजकारणातून घरी बसावं लागेल, मग शेतात जाऊन ऊस तोडण्याची परिस्थिती येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना दिला आहे.

पुण्यातील खराडी परिसरात मनोज जरांगे पाटील यांची आज जंगी सभा पार पडली. या सभेतून त्यांनी हा इशारा दिला आहे. अगदी आठवडाभरापूर्वी भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर गावात मराठा समाजाने लावलेले बॅनर काही लोकांनी फाडले होते. यावेळी जाब विचारणाऱ्या मराठा तरुणांनाही मारहाण करण्यात आली. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. ही मारहाण भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांनी केल्याचा आरोपही अनेकांकडून करण्यात आला. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी देखील दानवे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.आता पोस्टर फाडले तर आम्ही तुमचे कपडे फाडू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्यभर तुझ्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. मग ऊस तोडायलाच शेतात जावं लागेल, असं म्हणत जरांगे यांनी दानवेंवर शाब्दिक हल्लाबोल केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम