मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास आनंदच ; शरद पवार !
बातमीदार | २२ ऑक्टोबर २०२३
गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता राज्यभर दौरे व सभा घेत आहेत तर सरकारला दिलेली मुदत संपायला दोन दिवस आहे. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे आमचे लक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर आम्हाला आनंदच होईल, अशी भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मांडली.
आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भूमिका मांडली. शरद पवार म्हणाले, राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सुसंवाद झाल्याचे दिसत आहे. चांगला निर्णय झाला तर आम्हाला आनंदच आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांचा सुसंवाद झाल्याचे दिसत आहे. निर्णय कधी घ्यायचा याचा कालावधी ठरलाय असे दिसते. आम्ही देखील सरकार काय निर्णय घेते, याकडे आमचे लक्ष आहे. दोन दिवसांनंतर सरकारची भूमिका स्पष्ट होईल. मार्ग निघून प्रश्न सुटला तर आम्हाला आनंदच आहे.
दरम्यान, राज्यात कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करताना कंत्राटी भरतीचा पाप हे महाविकास आघाडी सरकारचे असल्याचे म्हटले होते. तसेच, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा या निर्णयाला आशीर्वाद होता, असेही फडणवीस म्हणाले. त्यावर शरद पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम