…पोपट का बोलत नाही ; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती टीका

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑक्टोबर २०२३

राज्यातील भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर ठाकरे गटाचे नेते आरोप प्रत्यारोप करीत असतांना आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चौफेर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, मुलुंडचा नागडा पोपट आता बोलत का नाही? आता हिंमत असेल तर बोला ना. तुम्ही आरोप केलेले अजित पवार, हसन मुश्रीफ आता मंत्री झाले आहेत. आता बोला ना, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर आज हल्लाबोल केला. तसेच, उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हाच खऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. बनावट माल बाजारात येतो आणि जातो, त्याची फार कोणी फिकीर करत नाही, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.

भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारकडून मविआ नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. मात्र, याच भाजपच्या नेत्यांनी पूर्वी ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्व नेत्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतले आहे. अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचे काय झाले? मुलुंडचा नागडा पोपट आता बोलत का नाही? आता हिंमत असेल तर बोल ना. राऊत म्हणाले, मुलुंडच्या पोपटाने यापूर्वी अजित पवार, राहुल शेवाळे, भावना गवळी, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ अशा कित्येकांवर आरोप केले. त्याची मोठी यादीच आहे. ते सर्व आता भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. यांच्यावर तर गुन्हे दाखल झाले होते ना. त्याचे काय झाले? सर्व गुन्हेगार व गुंड हे भाजपात आश्रयासाठी जात आहेत. आपल्या फायद्यासाठी भाजपही त्यांचा वापर करत आहे. भाजप हा गुंडांचा पोशिंदा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम