मराठा आरक्षणाबाबत मराठा मराठा क्रांती मोर्चाने मांडली भूमिका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या काही महिन्यापासून जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहे तर दुसरीकडे राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची वेळ संपत आल्याने २५ तारखेपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्यापूर्वीच मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, सरकारने कुणबी म्हणून आरक्षण देऊन तात्पुरती मलमपट्टी करु नये. हिंदू मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं आणि तेही ५० टक्क्यांच्या आतलं. त्यासाठी २६ तारखेनंतर मुंबईत मोठा मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. सुनील नागणे म्हणाले की, मुंबईच्या दिशेने मराठा समाजाचं वादळ निघणार आहे, ते सरकारला झेपणार नाही. आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यामध्ये अडचणी आहेत. किशोर चव्हाण यांनी यासंदर्भात २०१६ मध्ये याचिका दाखल केली होती, ती कोर्टाने फेटाळली होती.

ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे यांच्याशी आमचे मतभेद आहेत परंतु मनभेद नाहीत. सरकारने मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करु नये. कुणबी प्रमाणत्र देऊन तात्पुरतं आरक्षण देऊ नये. कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशी गल्लत न करता सकसकट आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. दरम्यान, रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. २५ तारखेपासून ते अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसत आहेत. शिवाय प्रत्येक गावात साखळी उपोषण करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये एकाही आमदार, खासदार आणि मंत्र्याला पाय ठेवू देणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम