मराठा आंदोलन तीव्र : मुख्यमंत्र्यांच्या फोटोला फासले काळे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केली त्यानंतर अनेक ठिकाणी दौरे देखील केली तरी सुद्धा सरकारने कुठलाही निर्णय न घेतल्याने आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु झाले आहे तर आज आंदोलन तीव्र झाल्याचे दिसत आहे.

आज छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरून जाणाऱ्या बसवरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या जाहिरातीतला फोटोला काळे फासले आहे. तर फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील सात ते आठ मराठा तरुणांनी पाण्याच्या टाकिवर चढून शोले स्टाइलने आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री यांच्या दसरा मेळाव्यासाठी सिल्लोडमधून गेलेल्या एसटी महामंडळाच्या बसवर मंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता. मराठा तरुणांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरून जाणाऱ्या बसला थांबवत या पोस्टरला काळे फासले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम