अजितदादांचे पुन्हा झळकले ‘भावी मुख्यमंत्री’ पदाचे बॅनर

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ ऑक्टोबर २०२३

राज्यात मुख्यमंत्री पदासाठी गेल्या अनेक वर्षापासून रस्सीखेच सुरु होती. नुकतेच राज्यातील भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या कवितेचा व्हिडिओ ‘एक्स’ अकाऊंटवरून पोस्ट केला होता. या पोस्टनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. या व्हिडिओनंतर भाजप नेत्यांनी केवळ कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, या दृष्टीने व्हिडिओ पोस्ट केल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता पुण्यात ‘भावी मुख्यमंत्री फक्त अजितदादा पवार’ अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमुळे राज्याच्या राजकारणातील चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या व्हिडिओनंतर आता अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. पुण्यात अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यात अजित पवार गटाच्या राहुल पायगुडे या कार्यकर्त्याने बॅनर लावले आहेत.

पुण्यात राहुल पायगुडे यांनी अजित पवार यांचं बॅनर लावलं आहे. या बॅनरवर ‘विकासाचा वादा अजितदादा’ असं लिहिलंय. त्याचबरोबर ‘होय म्हणूनच भावी मुख्यमंत्री फक्त अजितदादा पवार’ असंही बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. भाजप महाराष्ट्रच्या ‘एक्स’वरील ‘मी पुन्हा येईन’ या व्हिडिओ पोस्टनंतर अजित पवार यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम