कचरा टाकण्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण
अमळनेर;– अंगणात कचरा टाकण्याच्या कारणावरून तरूणाला लोखंडी सळई, कुऱ्हाडींचा दांडा आणि लोखंडी हातोडीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील धार येथे घडली आहे. याप्रकरणी रविवारी मारहाण करणाऱ्या ७ जणांविरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, दिनेश संभाजी पाटील वय २१ रा. धार ता. अमळनेर हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या बाजूला पुरूषोत्तम पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० अंगणात कचारा टाकू नका असे दिनेशने सांगितले. याचा राग आल्याने सुनिल शालीग्राम पाटील, अनिता सुनिल पाटील, सुनिता सुर्यकांत पाटील, सुर्यकांत अशोक पाटील, शशिकांत माधव पाटील, निलाबाई शालीग्राम पाटील आणि दिव्येश सुनिल पाटील सर्व रा. धार ता. अमळनेर यांनी लोखंडी सळई, कुऱ्हाडींचा दांडा आणि लोखंडी हातोडीने दिनेश पाटील याला बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच त्याला जीवेठार मरण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जखमी दिनेशला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार घेतल्यानंतर रविवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता दिनेश पाटील यांनी मारवड पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारे सुनिल शालीग्राम पाटील, अनिता सुनिल पाटील, सुनिता सुर्यकांत पाटील, सुर्यकांत अशोक पाटील, शशिकांत माधव पाटील, निलाबाई शालीग्राम पाटील आणि दिव्येश सुनिल पाटील सर्व रा. धार ता. अमळनेर यांच्या विरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल तेली हे करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम