देशात 10 पैकी 7 विवाहित महिला परपुरुषांसोबत राहतात

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार I १८ डिसेंबर २०२२ I ए का डेटींग अ‍ॅपने नुकतंच एक सर्व्हेक्षण केलं आहे. ग्लीडन असं या डेटींग अ‍ॅपचं नाव आहे. हे सर्व्हेक्षण लग्न झालेल्या महिला आणि पुरुष यांचे विवाह्य बाह्य संबंध का असतात, हे जाणून घेण्यासाठी झालं.

याद्वारे डेटिंग अ‍ॅपच्या सहाय्याने भारतातील विवाहित महिला आपल्या पतीची फसवणूक का करतात याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या सर्व्हेक्षणातून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

या सर्व्हेक्षणामध्ये समावेश असलेल्या व्यक्तींनी दिलेल्या उत्तरामध्ये एक उत्तर फार हैराण करणार आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, 10 मधून 7 महिला त्यांच्या पतीला धोका देतात. धोका देण्यामागील कारण म्हणजे, हे पुरुष घरातील कामात हातभार लावत नाही. एक नजर टाकूया, या अहवालातून काय माहिती समोर आली आहे.

एकट्या भारतात ग्लीडेन अ‍ॅपचे 5 लाखांहून अधिक युझर्स आहे. तर जगभारत जवळपास 5 मिलियन म्हणजेच 50 लाखांपेक्षा अधिक युझर्स असल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे, हे अ‍ॅप वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक लोकं हे विवाहित आहेत.

 

या सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या रिपोर्टनुसार, भारतात 10 मध्ये 7 महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती आहे. याचा अर्थ लग्नानंतर पतीशिवाय इतर पुरुषांसोबत या महिलांचे संबंध आहे. यामध्ये समावेश असलेल्या काही महिलांच्या म्हणण्याप्रमाणे, लग्नामध्ये आता रस राहिला नाहीये, त्यामुळे बाहेरील पुरुषांशी संबंध ठेवले गेले.

मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता सारख्या मोठ्या महानगरातील शहरांमध्ये अशा महिला अधिक होत्या, ज्या आपल्या पतीला धोका देत होत्या. काही महिलांचं असं म्हणणं होतं की, त्यांचे पती घरातील कामांमध्ये त्याची मदत करत नाही. त्यामुळे आम्ही वैतागतो आहोत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम