चीनमध्ये कोरोनाचा कहर; अंत्यसंस्कारासाठी लागल्या लांब रांगा

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार I १८ डिसेंबर २०२२ I चीनमधील कोरोना महामारीचा कहर अजूनही थांबलेला नाही. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या बीजिंगमध्ये शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं.

अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठ्या संख्येने मजूर आणि चालकांची कोविड चाचणी पॉजिटिव्ह आली आहे, ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. अलीकडेच देशात ‘झिरो कोविड पॉलिसी’ विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली.

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागला. यानंतर चीनने अचानक आपला कोविड व्यवस्थापन प्रोटोकॉल बदलला. सतत चाचणी, लॉकडाऊन आणि कठोर प्रवास निर्बंधांसह, चीन कोविड साथीच्या आजाराचा सामना करत आहे. देशाने आपल्या 1.4 अब्ज लोकसंख्येला सांगितले आहे की, सौम्य लक्षणं असल्यास घरांमध्येच स्वत: ची काळजी घ्यावी.

बीजिंगमध्ये 7 डिसेंबर रोजी कोविड व्यवस्थापन धोरणांमध्ये बदल झाल्यापासून, कोविडमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोना व्हायरसचा पार्लर, रेस्टॉरंट आणि कुरिअर फर्म्सपासून अधिक सेवांमधील मजूर आणि कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. मियुन स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले, “आमच्याकडे आता कमी कर्मचारी आहेत. तसेच अंत्यसंस्कार सेवांची मागणी वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम