इनोव्हाला देणार मारूती टक्कर; जाणून घ्या किती असणार किंमत?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ एप्रिल २०२३ ।  प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते आपले हक्काचे घर असावे त्यानंतर एक चारचाकी गाडी असावी, जे लोक सध्या चारचाकी घेण्याच्या तयारीत असतील त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची असणार आहे. करणा नवीन मारुती कारचे बाजारात येत आहे.

या कारमध्ये ट्रिपल एलईडी डीआरएल सेट उपलब्ध असेल. याशिवाय, यात क्रोम फिनिश ग्रिल, एलईडी हेडलाइट, फ्लेर्ड व्हील आर्च, एलईडी टेललाइट आणि 18-इंच अलॉय व्हील असतील. नवीन मारुती कारचे इंटीरियर इनोव्हा हायक्रॉस सारखे असेल. यात ड्युअल-टोन डॅशबोर्ड, पॅनोरामिक सनरूफ आणि आरामदायी सीट मिळतील. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, ते 10.1-इंच इंफोटेनमेंट सिस्टम आणि मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोलने सुसज्ज असेल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यामध्ये ADAS आणि 6 एअरबॅग मिळतील.

नवीन मारुती एमपीव्ही इंजिन
मारुती सुझुकीची नवीन एमपीव्ही दोन इंजिन पर्यायांसह खरेदी केली जाऊ शकते. यापैकी एक 2.0-लिटर पेट्रोल इंजिन असेल, जे CVT गिअरबॉक्सशी जोडले जाईल. हा सेटअप 174hp पॉवर आणि 197Nm टॉर्क जनरेट करतो. दुसरे हायब्रिड सेटअप असलेले 2.0-लिटर इंजिन असेल, जे ई-CVT गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. त्याचे पॉवर आउटपुट 186hp आणि 187Nm असेल.

नवीन मारुती MPV किंमत
मारुती सुझुकीची ही नवीन MPV येत्या काही महिन्यांत लॉन्च होऊ शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 18 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम