पायाच्या तळव्याला मसाज करणे आहे फायदेशीर !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ जानेवारी २०२३ । आपण नेहमीच दिवसभर काम करून थकलेलो असतो, आपल्याला मानसिक आणि शारीरिक थकवा येतो. बहुतेक वेळेस अंगदुखी जाणवते, विशेषत: पाय जास्त दुखतात. पायाच्या तळव्यामध्ये देखील वेदना जाणवतात. अशावेळी अनेकदा लोक कोमट पाण्याने पाय शेकतात किंवा हिटिंग पॅड वापरतात. यामुळे काही वेळ आराम मिळतो. पाय दुखीमुळे थकवा जाणवतो आणि तणावामुळे निद्रानाशाचीही समस्या जाणवते. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर पायाच्या तळव्याला मसाज करणे फायदेशीर ठरू शकते.

पायांना आणि तळव्यांना रोज मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे तणाव दूर होऊन चांगली झोप येते आणि अनेक आजारांपासूनही बचाव होतो. पायांच्या तळव्याला मसाज करणे देखील आयुर्वेदात फायदेशीर मानले गेले आहे.  जर तुम्हाला निद्रानाशाची तक्रार असेल आणि रात्री नीट झोप येत नसेल तर पायाच्या तळव्याला मसाज करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना मसाज करा. यामुळे थकवा दूर होईल आणि तणाव कमी होईल. यामुळे चांगली झोप येईल.

सध्या अनेकांना नैराश्य आणि तणावाची तक्रार असते. दीर्घकाळ तणावामुळे नैराश्य येऊ शकते. मन शांत ठेवण्यासाठी पायाच्या तळव्याची मालिश करावी. त्यामुळे तणाव कमी होऊन मानसिक शांती मिळते. पायांना आणि तळव्यांना मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तळव्यांना मसाज केल्याने संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे त्वचेवर देखील तेज येते. सांधेदुखीचा त्रास असेल तर झोपताना नियमितपणे पायांना आणि तळव्यांना मालिश केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि नसांना आराम मिळतो. त्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. दररोज पायाच्या मालिश केल्याने लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. मसाज केल्याने चयापचय सुधारते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम