पावसामुळे सामना थांबला; आता होणार…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ नोव्हेबर २०२२ । हॅमिल्टनच्या मैदानावर होत असलेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आहे. पावसामुळे हा सामना 50-50 षटकांचा नसून 29-29 षटकांचा असेल. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. यावेळी पावसामुळे सामना पुन्हा थांबवण्यात आला आहे. सध्या भारताने 12.5 षटकांत 1 गडी गमावून 89 धावा केल्या आहेत.

भारताने 10 षटकांत केल्या 60 धावा
सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल चांगली फलंदाजी करत आहेत. या दोन्ही फलंदाजांनी भारताची धावसंख्या 50 धावा पार केली आहे. पावसामुळे दोन्ही डाव 29-29 षटकांचे करण्यात आले आहेत. भारताने 10 षटकात एक गडी गमावून 60 धावा केल्या. त्याचवेळी, 11 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 69 धावांवर पोहोचली आहे. सूर्यकुमार यादव 17 तर शुभमन गिल 42 धावा करत खेळत आहे. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली आहे.

 

 

सामना सुरु होताच भारताला धक्का
भारतीय कर्णधार शिखर धवन 10 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. मॅट हेन्रीच्या चेंडूवर त्याला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले. पावसानंतर धवन झटपट धावा करण्याच्या इराद्याने क्रीझवर आला, पण त्याला यश आले नाही. गेल्या सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली, मात्र या सामन्यात त्याला काही विशेष करता आले नाही. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 25 अशी आहे.
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्याची षटके कमी करण्यात आली आहेत. आता 29-29 षटकांचा सामना होणार आहे, डावात 10 मिनिटांचा ब्रेक असेल तर ड्रिंक्स ब्रेक नसेल. सततच्या पावसामुळे पंचांना ओव्हर कमी करणे भाग पडले आहे. टीम इंडिया सध्या 4.5 षटकात एकही विकेट न गमावता 22 धावांवर खेळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम