महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑगस्ट २०२३ | देशातील भाजप पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक बोलविली असून यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एका व्यासपीठावर आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट आहे.

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेल या ठिकाणी आजची बैठक होणार आहे. याच महिन्यात 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दिवशी I. N. D. I. A. आघाडीची बैठक मुंबईतील याच ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून आज होणाऱ्या बैठकीमध्ये तयारी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे. इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स I. N. D. I. A. आघाडीची पाटणा आणि बंगळुरूनंतर आता तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडियाची ही बैठक होईल. तिच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील प्रत्येकी ५ नेत्यांचा गट तयार करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीवरून त्यांच्याकडे या बैठकीच्या यजमानपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यात अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार असले तरी काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हेच बैठकीच्या केंद्रस्थानी असतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम