निधी फाउंडेशनतर्फे तांड्यावर मासिक पाळी स्वच्छता जनजागृती

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनी उपक्रम राबवला, मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप

बातमी शेअर करा...

जळगावातील निधी फाउंडेशनने जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त मेहरूण तलाव परिसरातील तांड्यावर जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमात महिलांना सॅनिटरी नॅपकिनच्या महत्त्वाबद्दल माहिती देऊन मोफत नॅपकिनचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी हेतल पाटील, जयश्री अहिरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

२८ मे: मासिक पाळी स्वच्छता दिवस का साजरा केला जातो?

२०१४ साली जर्मनीच्या ‘वॉश युनायटेड’ संस्थेने मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस दरवर्षी २८ मे रोजी साजरा केला जातो. २८ मे निवडण्याचे कारण म्हणजे मासिक पाळीचा चक्र साधारणतः २८ दिवसांचा असतो, असे डॉक्टर्स आणि वैज्ञानिक मानतात. त्यामुळे मे महिन्यातील २८ वा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून निवडला गेला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम