पुणे लोकसभा: थरारक निवडणूक, चुरशीच्या लढतीत कोण मारणार बाजी?

बातमी शेअर करा...

पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे कसबा आमदार रवींद्र धंगेकर आमने-सामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांचे बळ बरोबरीचे असल्याने निकालाबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे. “पुणे लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित आहे. लोकांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान केलं आहे,” असे मोहोळ म्हणाले. त्यांनी कोथरूड विधानसभेतून सर्वाधिक मताधिक्य मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.

दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडूनही विजयाचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार, हे पाहणे अत्यंत रोचक ठरणार आहे.

राजकीय स्थिती आणि प्रचाराचा आढावा

भाजपने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे पुण्यात जोरदार प्रचार केला. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी पुण्यात सभा घेतल्यामुळे वातावरण अधिक तापले. मुरलीधर मोहोळ यांना तगडा मराठा उमेदवार म्हणून समोर आणण्यात आले. काँग्रेसने महाआघाडीच्या मदतीने रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली.

वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे आणि एमआयएमने अनिस सुंडके यांना निवडणुकीत उतरवल्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. गटबाजी आणि मतांच्या ध्रुवीकरणामुळे या लढतीचे निकाल काय येतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम