देशातील मोठी बँक होणार ‘या’ बँकेत विलीनीकरण !
दै. बातमीदार । २८ जून २०२३ । देशातील मोठा व्यवहाराची समजली जाणारी बँक गृहवित्त कंपनी एचडीएफसी लि.चे खासगी क्षेत्रातील बँक ‘एचडीएफसी बँके’त १ जुलैपासून विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक व्यवहार असल्याचे मानले जाते.
एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या विलीनीकरणास मंजुरी देण्यासाठी एचडीएफसी व एचडीएफसी बँक यांच्या संचालक मंडळांची एक बैठक ३० जून रोजी होत आहे. त्यानंतर १ जुलैपासून विलीनीकरणाची अंमलबजावणी होईल. कंपनीच्या समभागांची सूचीबद्धता समाप्त करण्याचे काम १३ जुलैपासून अंमलात येईल.
या विलीनीकरणानंतर बँकेच्या भांडवलात पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होणार आहे. बँक पूर्वीपेक्षा अधिक जोखमीचे कर्ज देऊ शकणार आहे. यासोबतच सध्या एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या सेवा घेण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या शाखांमध्ये जावे लागत होते, मात्र आता एकाच शाखेत जाऊन तुमचे काम होणार आहे.
एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांनी आपण ३० जून रोजी पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे.
४ एप्रिल २०२२ एचडीएफसी लि.चे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
४० अब्ज डॉलर हा सौदा आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार होईल.
१८ लाख कोटी नव्या कंपनीची संपत्ती असेल.
२५ शेअरच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे ४२ समभाग समभागधारकांना मिळतील.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम