अमळनेर येथील वीज मंडळाचे अभियंता वैभव देशमख लाच घेताना अँटी क्रप्स्शन विभागाची कारवाई…

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख) तकारदार हे अंमळनेर शहरातील रहिवासी असून त्यांच्या अंमळनेर येथील स्वतःच्या मालकीच्या राहते घरात घरगुती वापराचे विज कनेक्शन असुन त्यांचे घरातील बसविण्यात आलेले विजेचे मिटर सुमारे ०५ महीण्यापासुन बंद पडले असल्याने तक्रारदार यांना दरमहा सरासरी रकमेची बिल आकारणी होत होती. सदर बिलाची तकारदार नियमित भरणा करीत होते. सुमारे १० दिवसांपूर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख, म.रा.वि. वि.कं मर्या अंमळनेर शहरी विभाग कक्ष १ हे तक्रारदार यांच्या राहते घरी येवुन विज मिटरची पहाणी करून गेले होते. त्यानंतर सदर कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील हे तक्रारदार यांच्या घरी येवुन कनिष्ठ अभियंता देशमुख यांच्या सांगण्यावरुन तकारदार यांना विज मिटर बदलविण्या करीता १०,०००/- रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगीतले होते. त्याबाबत तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रत्यक्ष येवुन आज दि.०५.१२.२०२२ रोजी लेखी तक्रार दिली होती.

तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन दि. ०५.१२.२०२२ रोजी अंमळनेर येथे पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांचे सांगणे प्रमाणे तक्रारदार यांचे राहते घरातील नादुरुस्त झालेले विजेचे मिटर बदलवुन देण्यासाठी व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी त्यांचे स्वतः करीता व कनिष्ठ अभियंता देशमुख यांच्या करीता तडजोडी अंती ५,०००/- रू पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम त्यांना अंमळनेर येथील तक्रारदार यांच्या राहते घरी आल्यावर देण्याचे सांगितले होते.

त्याप्रमाणे दि. ०५.१२.२०२२ रोजी तक्रारदार यांच्या अंमळनेर, कांतीनगर येथील राहते घरी सापळा लावला असता वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील यांनी तक्रारदार यांच्या कडुन पंचा समक्ष ५,०००/- रुपये लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री.अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश झोडगे तसेच पथकातील राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रविण पाटील, मकरंद पाटील, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल यांनी केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस उपअधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम