आ.रोहित पवारांच्या कंपनीवर मध्यरात्री कारवाई !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ सप्टेंबर २०२३

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रात्रीपासून राज्यात बाप्पांच्या विसर्जनाची तयारी सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर मध्यरात्री दोन वाजता कारवाई करण्यात आली आहे. स्वत: रोहित पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच, राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुनच ही कारवाई करण्यात आली, असा आरोपही रोहित पवारांनी केला आहे.

मात्र, रोहित पवारांच्या नेमक्या कोणत्या कंपनीवर व काय कारवाई करण्यात आली, हे अद्याप समोर आलेले नाही. रोहित पवारांनीही याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, आपल्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. दरम्यान, रोहित पवारांना अडचणीत आणू इच्छिणारे राज्यातील दोन मोठे नेते कोण? यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम