लाखो लोकांनी घेतला ओबीसीचा लाभ ; विरोधी पक्षनेत्यांचा गंभीर आरोप !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० सप्टेंबर २०२३

राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणा मुद्दा तापला असतांना पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले कि, मराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी 28 लाख लोकांना पैसे देवून ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा केला आहे. विशेषतः विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मराठा असून, ओबीसी सर्टिफिकेट घेतल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. राज्य सरकारने राज्यातील शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जातनिहाय सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मागासवर्गीय आयोग व मुख्य सचिवांकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, मराठा, अशा सर्व समाज घटकांमधील किती कर्मचारी सरकारी सेवेत आहेत याची पडताळणी केली जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. मराठवड्यातील जवळपास 28 लाख मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम