अखेर ओबीसी समाजाचे उपोषण उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सोडले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० सप्टेंबर २०२३ | राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र असतांना व मनोज पाटलांचे उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडल्यानंतर ओबीसी समाज देखील गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सुरु केले होते हे उपोषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मात्र, ते करताना ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली. या शिष्टाईनंतर ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांचे उपोषण मागे घेतले. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी आपले उपोषण सोडले. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी ओबीसी महासंघाचे उपोषण सुरू होते. दरम्यान काल सह्याद्री अतिथीगृहावर सरकारसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ओबीसी महासंघाने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातील ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी व विजय बल्की उपोषण सोडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.

राज्य सरकार ओबीसी समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्य सरकारने ओबीसी समाजालासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले. ओबीसींच्या कोणत्याही मुद्यावर सरकारची नकारात्मक भूमिका नसल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ओबीसी आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ओबीसींच्या कोणत्याही मुद्यावर सरकार नकारात्मक नाही. मराठा समाजालाही आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दोन्ही समाजात वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम