आर्मी स्कुलने राखली १०० टक्के निकालाची परंपरा
सलग दहाव्या वर्षी 100 टक्के निकाल
अमळनेर(प्रतिनिधी ) येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने १२ वी (विज्ञान) च्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. यात प्रथम- निरज प्रभाकर कोळी (८७.६७), द्वितीय- वैभव पितांबर सोनवणे (८६.१७), तृतीय- भावेश मिलिंद सोनवणे (८५.५०) तर आदिवासी विद्यार्थ्यांमधून प्रथम- आर्यन हुकूमसिंग पवार (८४.६७), द्वितीय- पिंटू कालुसिंग बारेला (८४.१७), तृतीय- स्वामी अशोक जांभोरे (८३.८३) यांनी यश संपादन केले आहे. ३५ विद्यार्थ्यांना ८० टक्के च्या पुढे तर २६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान १० वी चा निकालही ९८ टक्के लागला. यात प्रथम- अमोल सुरेश जोगी (९१.२०), द्वितीय- तुषार विजय राठोड (९१) व कुणाल शिवाजी मोरे (९१), तृतीय- ललितकुमार तुकाराम पाटील (९०.२०) यश संपादन केले. ४७ विद्यार्थ्यांना ८० टक्के च्या पुढे तर २ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नवलभाऊ प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शीलाताई पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील सर, संस्थेचे मानद संचालक प्रा. सुनील गरुड, प्राचार्य पी एम कोळी, कमांडंट तथा सुभेदार मेजर नागराज पाटील, बारावी चे केंद्र संचालक एस ए बाविस्कर, दहावीचे केंद्र संचालक जी पी हडपे व उमेश काटे यांनी अभिनंदन केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम