मंत्री भुजबळ यांना शिवीगाळ अन एक अटकेत !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑगस्ट २०२३ | राज्यात शिंदे व फडणवीस, पवार यांची सत्ता असतांना पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना भ्रमणध्वनीवर शिवीगाळ झाली होती. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या इसमाने मंत्री भुजबळ यांना शिवीगाळ केली होती त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी येथील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात भुजबळ यांनी केलेल्या विधानावरून विशिष्ट घटकांकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. या घटनाक्रमात एकाने सोमवारी दुपारी भ्रमणध्वनीवरून भुजबळ यांना लघूसंदेश पाठविला होता. तो क्रमांक त्यांनी बंद (ब्लॉक) केला. त्यानंतर काही वेळात संशयिताने व्हॉट्सॲपवर फोन करीत शिवीगाळ केली होती. औरंगाबाद येथून पोलिसांनी इंद्रनील कुलकर्णी या संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंबादास खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला असता तो औरंगाबाद येथील असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने औरंगाबाद येथून इंद्रनील कुलकर्णी (४४) याला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम