ठाकरेंची ताकद वाढणार ; माजी खासदाराने बांधले शिवबंधन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑगस्ट २०२३ | राज्यातील शिंदे गट ठाकरे गटातील एक-एक नेत्यांसह पदाधिकाऱ्याचा प्रवेश करीत असतांना एक मोठा प्रवेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घडवून आणलेला आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह आज २३ ऑगस्ट ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील मतोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवसस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाकचौरे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर काँग्रेस, भाजप असा प्रवास करून वाकचौरे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहेत.

भाऊसाहेब वाकचौरे यांना मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी वाकचौरे यांनी आपली चुक मान्य करत, यापुढे शिवसेनेला दिल्लीपर्यंत पोहचवणार असल्याचे जाहीर केले. आता जे कोणी शिवसेना संपवण्यासाठी येतील आपल्याला त्यांना संपवायचं आहे अशी प्रतिक्रिया यावेळी वाकचौरे यांनी बोलताना सांगितले. शिवसेना आता फक्त महाराष्ट्रात नाही तर दिल्लीच्या तख्तापर्यंत नेऊन पोहचवायची आहे असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सुबह का भूला शाम को वापस लौटता आहे तो उसे भूला नही कहते. तो मी आहे. मी घर वापसी केली आहे. मी काहीही चूका केल्या असल्या तरी मी घर वापसी केली आहे. तो अपराध मी मान्य करून परत आलो आहे असेही वाघचौरे म्हणाले. आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सगळे जिल्हाप्रमुख, माजी जिल्हाप्रमुख विद्यामान पदाधिकारी सर्व याठिकाणी आले आहेत, भाऊसाहेबांसोबत संजय छिल्लारे यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी आज पक्ष प्रवेश केल्याचे विनायक राऊत यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम