मंत्री गडकरीना पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ मार्च २०२३ ।  देशातील भाजपमध्ये आपले चांगले वर्चस्व निर्माण केलेले व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत, त्यामुळं खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील महिन्याभरापूर्वी त्यांना धमकीचे फोन आले होते. आज त्यांच्या संपर्क कार्यालयात पुन्हा दोनदा असे फोन कॉल्स आले.

मंगळवारी सकाळी दोन वेळा गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन आले. यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्यावेळी १४ जानेवारीला ज्याच्या नावे बेळगावच्या तुरुंगातून धमकीचे फोन केले होते. त्याच जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी नामक व्यक्तीच्या नावे आज पुन्हा धमकीचे फोन आले. या फोननंतर गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती तात्कळ पोलिसांना दिली. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या विषयाला दुजोरा दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम