यंदाच्या गुढीपाडव्यापासून या राशी होतील धनवान !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ मार्च २०२३ ।  मराठी नववर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा असतो. साडीतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा गुढी पाडव्याला असतो. कोणत्याही उद्योगासाठी गृहप्रवेश, वस्तू खरेदीदात्यासह चांगल्या कामासाठी हा दिवस शुभ मानला जातो. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्ताचा आपल्या राशींवरही तितकाच सकारात्मक परिणाम पडतो. या वर्षी गुढी पाडवा कोणत्या राशीसाठी फलदायक असणार आहे.

हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

या खालील तीन राशींसाठी यंदाचा गुढी पाडवा आर्थिकदृष्ट्या भरभराटीचा असणार आहे. चला तर जाणून घेऊया.

धनु – धनु राशींसाठी मराठी नवीन वर्ष उत्तम असणार आहे. नवीन वर्षात धनु राशीला सुख आणि समृद्धी आणि भरपूर धन मिळणार. व्यवहारात फायदा होणार. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार. अपेक्षित फळ आणि प्रसिद्धी मिळेल. पगारात वाढ होणार. कुटूंबांसोबत वेळ घालवाल.

सिंह- सिंह राशीसाठी यंदाचा गुढी पावडा फलदायक असणार आहे. या राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव नाही. संपत्तीत भरभराट होणार. हाती घेतलेले काम पुर्ण कराल. कामाच्या ठिकाणी यश आणि प्रसिद्धी मिळेल. लोकांकडून भरभरुन प्रेम मिळेल. व्यवसायात नफा होणार.

मिथुन – मिथून राशीसाठी यंदाचा गुढी पाडवा राजयोग असणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होणार. गुढी पाडवा आनंदाचा जाणार. नोकरी करणाऱ्यांना इन्क्रिमेंट मिळण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम