मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : जनतेला मिळणार १०० रुपयात आनंदाचा शिधा !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑगस्ट २०२३ | राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाची मुंबईत आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे, राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्दा केला आहे. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर कॅसिनो सुरु करण्याचा विचार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रात कॅसिनोची घाण नकोच, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार, आता कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण व कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून अस्तित्त्वात आहे. पण, त्याची अद्याप अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यास इच्छूक लोक वारंवार न्यायालयात जातात आणि कॅसिनो सुरू करण्याची परवानगी मागतात. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदाच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता कॅसिनो सुरू करण्यावर बंदी असणार आहे. याशिवाय आगामी काळातील गौरी-गणपती उत्सावासह दिवाळीत नागरिकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे.
कॅसिनो कायद्यात कॅसिनोसाठीची परवाना प्रक्रीया, आकारले जाणारे शुल्क, तसेच परवाना रद्द करण्याच्या नियमांचा समावेश आहे. देशातील गोवा, सिक्किम येथे कॅसिनो गेमिंगला परवानगी आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा कायदा मंजूर करावा, अशी मागणी केली होती. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे येथील पर्यटन उद्योगाचा विकास होईल, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, महाराष्ट्रात कॅसिनोची ही घाण नको, अशी भूमिका पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम