नाराज नाही ; सबुरी का फल मिठा होता है ; शिंदेंच्या आमदारांचा दावा !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार| १८ ऑगस्ट २०२३ | राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांनी प्रवेश केल्यानंतर शिंदे व भाजप आमदारांची मोठी कोंडी झाल्याची बातमी गेल्या काही दिवसापासून होत असतांना नुकतेच शिवसेनेतील एका नेत्याने आपली बायको आत्महत्या करेल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिपद मागून घेतले. म्हणून आपले मंत्रिपद हुकले, असा गौप्यस्फोट कालच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केला होता. आजदेखील माध्यमांशी बोलताना आपली मंत्री बनण्याची तीव्र इच्छा भरत गोगावले लपवू शकले नाही.

उर्वरित मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी? असा प्रश्न भरत गोगावलेंना पत्रकारांनी विचारताच आता पंचागच बघणार, असे तडक उत्तर भरत गोगावले यांनी दिले. तसेच, आता मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा तो व्यवस्थित होईल. सबुरी का फल मिठा होता है, असे म्हणत आपल्यालाही मंत्रिपदाची खूर्ची मिळेल, असा विश्वास भरत गोगावलेंनी व्यक्त केला. आपण मंत्रिपदाची इच्छा अजून सोडलेली नाही, हे भरत गोगावलेंनी आज पुन्हा स्पष्ट केले.

भरत गोगावले म्हणाले, शिवसेनेतील एका नेत्याने आपली बायको आत्महत्या करेल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिपद मागून घेतले. यावरून काही जण आम्ही मुख्यमंत्री शिंदेंवर दबाव टाकत आहोत, असा चुकीचा अर्थ काढत आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. तसेच, मी नाराज आहे, अशीही अफवा पसरवली जात आहे. मी आजच मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. मी नाराज असतो तर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली असती का?, असा सवाल भरत गोगावलेंनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम