
एरंडोल ग्राम विकास अधिकाऱ्यांचा गलथान कारभार; RGSA बाबत काही सरपंचांकडून जाहीर निषेध
दै. बातमीदार l ७ ऑक्टोबर २०२२ | राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (RGSA) २०२२-२३ अंतर्गत नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना ६ ते ९ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत क्षमता बांधणी कार्यक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर अभियानाचा (RGSA) कार्यक्रम हा ६ ऑक्टोबर २०२२ पासून ४ दिवस आयोजित करण्यात आला आहे. नवनिर्वाचित व ज्या सरपंचांनी अद्याप पावेतो प्रशिक्षण घेतले नाही, त्या साठी सदर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
मात्र गटविकास अधिकारी एरंडोल यांनी सदर प्रशिक्षण अभियानाचे तीन तेरा वाजवत अभियानाचे दि.३० सप्टेंबर २०२२ चे पत्र ६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ग्रामसेवकांमार्फत विद्यमान सरपंचांना पोहोचवले. त्यातच त्यांचा ‘महाप्रताप’ म्हणजे त्या पत्रासोबत सरपंचांनी जी यादी जोडली, ती देखील माजी सरपंचाची यादी असल्याचे दिसून आले. तसेच सदर (RGSA) अभियानाची वेळ देखील सदर पत्रात नमूद केलेली नाही. त्या मुळे नवनिर्वाचित सरपंचांनी नाराजी व्यक्त करत सदर गट विकास अधिकाऱ्यांच्या या ‘महाप्रताप’ बाबत निषेध व्यक्त केला. तर काही सरपंचांनी सदर अभियानाकडे पाठ फिरवली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम