अमळनेरात महापूजन आणि जलोष कार्यक्रमाने रंगला श्री महाराणा प्रतापांचा जयंती सोहळा

बातमी शेअर करा...

स्मारकाजवळ “हॅलो अमळनेर” संकल्पना रुजविणाऱ्या मुख्याधिकारी सरोदेंचा विशेष सत्कार

अमळनेर(प्रतिनिधी )-शहरात सालाबादाप्रमाणे यंदाही गुरुवार दि.2 जून रोजी हिंदु सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,यानिमित्ताने शहरातील राणा प्रतापांच्या स्मरकाजवळ महापूजन व जल्लोष सोहळा उत्साहात पार पडला.
त्याची जय्यत तयारी सुरू आहे.
विशेष म्हणजे यावेळी स्मारकाच्या बाजूलाच नगरपरिषदेच्या सहयोगाने “हॅलो अमळनेर”ही नाविन्यपूर्ण संकल्पना साकारल्याबद्दल मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला,तर यासाठी विशेष सहकार्य करणारे फोटोग्राफर महेंद्र पाटील यांचेही कौतुक करण्यात आले.अमळनेर तालुका राजपुत एकता मंच,अमळनेर तालुका राजपूत समाज पंच मंडळ आणि श्री महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता,सायंकाळी शहरातील श्री महाराणा प्रताप चौकातील स्मारकस्थळी उत्कृष्ठ सजावट करण्यात आली होती,यावेळी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ व माजी आ डॉ बी एस पाटील यांच्या हस्ते व लोकप्रतिनिधी आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्मारकाचे महापूजन व माल्यार्पण करण्यात आले,यानंतर उपस्थित मान्यवरांनीही पूजन केले,राणा प्रतापांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता,आकाशात झालेल्या अतिषबाजीने डोळ्यांचे पारणे फेडले,यावेळी बँड पथकाच्या तालावर सर्व समाजबांधवांनी ठेका धरून मोठा जल्लोष साजरा केला,काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीही यात हिरारीने सहभाग घेतला.यावेळी सर्व राजपूत समाजबांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते,अनेकांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर केली.

नादब्रह्म च्या “महिला ढोल पथकाने” वेधले लक्ष

यावेळी अमळनेर येथील सुप्रसिद्ध चैतन्य बहुउद्देशीय संस्थेच्या नादब्रह्म महिला ढोल पथकास निमंत्रित करण्यात आले असल्याने त्यांनी उत्कृष्ठ कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले,महिला भगिनी असताना त्यांच्या ढोल चा नाद अनेकांना अचंबित करणारा होता,अनेकांनी त्यांची कला पाहून आकर्षक बक्षिसे दिलीत, तर या पथकाचे अध्यक्ष विवेक नाईक तसेच पथकातील सौ पांडे आणि इतर कलाकारांचा महिला महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी,संचालक डॉ अनिल शिंदे,प्रदीप अग्रवाल,पुणे येथील राजपुताना फाऊंडेशन चे महाराष्ट्रचे अध्यक्ष गिरीशसिंह परदेशी,विनोदसिंह राऊळ,माजी सभापती श्याम अहिरे,शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील,अर्बन बँक संचालक प्रवीण जैन,भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,खा शि मंडळाचे माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन,विक्रांत पाटील,महाराणा प्रताप मित्र मंडळाचे अध्यक्ष अँड विवेक लाठी,प्रसाद शर्मा,नगरसेवक राजेश पाटील,राजू फाफोरेकर,भाजपचे जिजाब पाटील,राकेश पाटील,न प चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी,डॉ शरद पाटील,समाजसेवक योगराज संदानशीव,ओमप्रकाश लाठी, अनिल रायसोनी,पराग ताथेड, यासह पत्रकार बांधव व असंख्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्व.बाबूसिंग परदेशी प्रतिष्ठान तर्फे उपस्थितांना मोफत निम्बु शिकंजी वाटप करण्यात आली. राणाजींचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी अमळनेर शहर व ग्रामिण भागातील सर्व राजपूत समाजबांधव,श्री महाराणा प्रताप प्रेमी आणि विशेष करून महिला भगिनी आणि तरुण तरुनीनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.सोहळा यशसबीतेसाठी अमळनेर तालुका राजपूत एकता मंच, राजपूत समाज पंच मंडळ,आणि श्री महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम