आमदार अपात्र प्रकरणी आज होणार सुनावणी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १२ ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या वर्षापासून सुरु असलेल्या शिवसेनेच्या सत्तासंघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपावले आहे. या प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. या सुनावणीच्या वेळापत्रकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बदल केला असून 13 ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे. वास्तचविक जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार आहेत. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर अआली आहे. मात्र, या प्रकरणी 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी बदल करण्यात आलेल्या या वेळापत्रकावर सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना अपात्र आमदारांची सुनावणी विलंबाने होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाने कठोर शब्दात निर्देश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीने धरला आहे. राहुल नार्वेकर यांनी ठरवलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकरणाची सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांकडून या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही सुनावणी आज होणार आहे. शिवसेना अपात्रतेसंबंधी एकूण 40 याचिका विधानसभा अध्यक्षांच्या समोर आहेत. या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्या अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

विधान भवनामध्ये आजच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. जी-20 देशांच्या सभागृह अध्यक्षांच्या बैठकीसाठी ते दिल्लीला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात देखील या प्रकरणाची सुनावणी होत आहे. त्यामुळे या प्रकरणावर दिल्लीत कायदेशीर खलबते होणार असल्याची चर्चा आहे. राहुल नार्वेकर दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम