मुंबईत होणार ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १२ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक तरुण बेरोजगारीत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, यासोबतच मुंबई पोलिस दलावरील ताण कमी करण्यासाठी तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. ही भरती जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी असेल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या मुंबई पोलिसांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. त्या मुळे मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी अशा प्रकारची भरती करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांवर कामाचा सर्वाधिक ताण आहे. त्यातच मुनष्यबळाची कमतरता असल्याने पोलिसांवर जास्तीचे काम पडत होते. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी तसेच नवीन भरती पूर्ण होण्याआधी या प्रकारची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 30 कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलात सध्या मनुष्यबळाची टंचाई आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला आहे. आता नवी भरती प्रक्रिया होईपर्यंत कंत्राटी भरती करण्यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी विनंती केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसमध्ये सध्या कंत्राटी भरतीचा निर्णय गृह विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. राज्य सुरक्षा महामंडळाच्या वतीने कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने भरती झालेल्या पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटींची तरतूदही राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम