मनसे नेते देशपांडे हल्ला प्रकरणी : ठाकरे गटाचे पदाधिकारी ताब्यात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मार्च २०२३ । मनसे नेते संदीप देशपांडे काल शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. रोज त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र शुक्रवारी ते एकटेच असल्याची संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टंप होते. त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. मात्र, हल्लेखोरांना संदीप देशपांडे यांनी चांगलाच प्रतिकार केला.

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेला आरोपी ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. हा आरोपी ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. भांडुपच्या कोकण नगर भागातून कसली पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यापासून ठाकरे गटावर संशय व्यक्त करण्यात आलेला होता.

सध्या ताब्यात घेतलेला आरोपी हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईतल्या भांडूप भागातून दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं असून राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिस इतर आरोपींचाही शोध घेत आहेत. सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्यापैकी एक अशोक खरात या व्यक्तीची ओळख पटली आहे. खरात हा शिवसेनेच्या थके गटाची माथाडी संघटना आहे त्याचा तो उपाध्यक्ष आहे. त्याचबरोबर अशोक खरात हा भांडुप कोकण नगरमध्ये राहतो. त्याचबरोबर सोळंखी हा त्याचा सहकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

या गुन्ह्याबरोबर अशोक खरात यांच्यावरती आणखी गुन्हे असल्याची माहिती आहे. या घटनेप्रकरणी क्राईम ब्रांच कारवाई करत आहे. मात्र यांच्यामागे आणखी कोणी आहे का याचाही तपास पोलिस घेत आहेत. कारण ते ज्या युनियनचे उपाध्यक्ष आहेत. त्याच्या अध्यक्ष आप्पा करडकर यांच्या नाववरतीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम