गुरुच्या श्रद्धावंदन दिनी शिष्याने दिली जुगलबंदी कीर्तन सेवेने आदरांजली

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

     जैन इरिगेशन चे संस्थापक स्व. पद्मश्री भवरलालजी जैन तथा मोठे भाऊ यांच्या सातव्या श्रद्धा वंदन दिवसानिमित्त वाडे (ता.भडगाव) येथील उद्यान पंडित राजेंद्र पाटील यांनी जुगलबंदी कीर्तनाचे आयोजन केले होते. जुगलबंदी कीर्तनासाठी सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार व भागवताचार्य टीव्ही स्टार ह.भ.प. मुक्ताताई चाळक व ह.भ.प.शिवानीताई चाळक यांची कीर्तन जुगलबंदी चांगलीच रंगली.

     कीर्तन सेवेसाठी गुरु शिष्याचे नाते कसे असावे यासाठी महाराजांनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंगाची निवड केली. ‘आपुलिया हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती, जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतनविठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही’ या चार चरणाचा अभंगाची निवड केली. या चार चरणाच्या अभंगातून त्यांनी मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ हे प्रमाणासह श्रोत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलगा जितका श्रेष्ठ आहे तेवढ्याच प्रमाणात मुलगी सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणून कोणीही मुलीचा गर्भातच भ्रूणहत्या करू नका हे अवहान त्यांनी केले. विषेश म्हणजे उदाहरणासहित त्यांनी ते पटवून देत असताना अभंगाच्या तिसऱ्या चरणात त्यांनी महाभारतातील उत्तम उदाहरण देऊन सांगितले की, जसे श्रीकृष्ण आणि त्यांचे शिष्य अर्जुन होते. श्रीकृष्ण अर्जुनाला जसे सांगत होते त्याप्रमाणे अर्जुन शिष्य हे प्रमाण समजत होते.

     त्याचप्रमाणे आज आम्हाला असे जाणवत होते की, आजही गुरु-शिष्याचे नाते जपणारे कलियुगातही गुरु शिष्य आहेत. जसे की आज पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन यांचे श्रद्धा वंदन दिवस आहे. म्हणून शिष्याने म्हणजेच राजेंद्र पाटील व सौ स्वाती पाटील यांनी हे गुरु-शिष्याचे नाते जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कीर्तनासाठी आलेल्या भाविक श्रोत्यांना उदाहरणासह जेव्हा पटवून दिले. त्यावेळी भक्तांच्या डोळ्यात अश्रू आले होते. किर्तन समितीच्या वेळी कीर्तनकार महाराज यांना सौ शारदा पाटील व सौ स्वाती पाटील यांनी फुलहार अर्पण करून आशीर्वाद घेतला. सदर कीर्तनासाठी टाळकरी मृदुंगाचार्य पेटीवादक गायक हे सर्व महिलाच होते. हे या कीर्तनाचे आकर्षणही ठरले. कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या प्रतिमेचे जैन परिवाराचे सदस्य चंद्रकांत जैन डॉक्टर के. बी. पाटील ,राजेंद्र पाटील, स्वाती पाटील यांनी पूजन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम