ठाकरे गटाच्या अंधारेंची सभा मनसे उधळणार ; या जिल्ह्यात मनसे आक्रमक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ डिसेंबर २०२२ ।  मुलुंड येथील सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे. त्याचा उठ दुपारी आणि घे सुपारी… असाच कार्यक्रम असतो. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. 1 डिसेंबर रोजी त्यांनी हे वक्तव्य केलं. ते अचानक गुहेतून बाहेर येतात. अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी नाव न घेताच केली होती.. यावरून राज्यभरातील मनसे नेते आक्रमक झाले आहेत. उस्मानाबादमधील पदाधिकाऱ्याने सुषमा अंधारे यांना थेट इशारा दिला आहे.

Gapat

राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आधी माफी मागावी. अन्यथा त्यांची महाप्रबोधन यात्रा आणि त्यातली सभा उधळून लावू, असा इशारा मनसे नेत्याने दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची उद्या उस्मानाबाद येथे जाहीर सभा आहे. मात्र आधी माफी मागा, अन्यथा तुमची सभाच उधळून लावू, असा इशारा मनसेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गपाट यांनी इशारा दिला आहे.ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे आता मनसैनिकांची, राज ठाकरेंची माफी मागतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. त्यांनी माफी मागितली नाही तर सभास्थळी मनसैनिक गोंधळ घालण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. उद्या सायंकाळी 6 वाजता अंधारे यांची उस्मानाबाद येथे सभा आहे. मनसेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गपाट यांनी इशारा दिला आहे. राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरले वरून मनसे आक्रमक झाली असून माफी मागायची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम