महाविकास आघाडी सरकार जाताच मनसेचा आवाज नरमला ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ । महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात मनसेने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती त्याचे पडसाद राज्यात काही भागात पाहायला मिळाले होते, परंतु शिंदे सरकार आल्या पासून हे आंदोलनाचा आवाज नरमल्याचे खुद्द एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे, काही काळ त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांचे चिरंजीव मनविसे प्रमुख अमित ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा समारोप औरंगाबादेत आहे. त्याची माहिती देण्यासाठी बुधवारी (१२ ऑक्टोबर) पत्रकार परिषद झाली. त्यात ही कबुली देण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय नाट्य सुरू आहे. त्यामुळे आम्ही आक्रमक असूनही भोंग्यांच्या मुद्द्याकडे आमचे दुर्लक्ष झाले. शहरातील बहुतांश धार्मिक स्थळांवरून पुन्हा भोंग्यांचा आवाज वाढू लागला आहे. आवाजाविषयी सरकारने घालून दिलेले नियम पाळले जावेत, यासाठी आम्ही आग्रही असल्याचे जिल्हाप्रमुख सुमीत खांबेकर यांनी सांगितले. तर याबाबत निवेदन आणि प्रशासनाला स्मरणपत्र देण्याचे काम सुरू असल्याचे शहर अध्यक्ष आशिष सुरडकर यांनी सांगितले. या वेळी राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, बिपिन नाईक, गजन गौडा पाटील, अनिकेत निल्लावार, संकेत शेटे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

दोन दिवसांचा दौरा; रॅली, बैठक युवा सेना पदाधिकाऱ्यांचा प्रवेश अमित ठाकरेंच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात रॅली, प्रवेश आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता ते शहरात येणार आहेत. िचकलठाणा ते हाॅटेल रामापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. १४ आॅक्टोबर रोजी ते विद्यार्थी सेना आणि मनसेच्या बैठका घेणार आहेत. खोकडपुरा येथे सदस्य नोंदणी शिबिराला भेट आणि काही कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा असणार आहे. युवा सेनेतील पदाधिकारी मनसेत प्रवेश करणार असल्याचा दावा खांबेकर आणि इतरांनी केला. अमित ठाकरे उस्मानपुरा येथे खांबेकरांच्या कार्यालयाला भेट देऊन वेरूळला दर्शनासाठीही जाणार आहेत.

वॉर्डासाठी तयार केलेले उमेदवार पळवण्याची भीती मनसे यापुढे प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढणार आहे, असे मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. औरंगाबादेतील २७ वाॅर्डांत मनसेची चांगली तयारी झाली आहे. आता इतर वाॅर्डांत काम सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले. २७ संभाव्य उमेदवारांची नावे सांगा, असे विचारले असता आत्ताच आम्ही नावे जाहीर करू शकत नाही. कारण इतर पक्षातील नेते आमचे तयार केलेले उमेदवार पळवतील, अशी भीती आहे, असा दावा करण्यात आला. संघटनेचे पदाधिकारीही मनपा निवडणूक लढतील, अशीही माहिती देण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम