नवरात्रोत्सवात विक्रम : तुळजापूरच्या देवस्थानास 15 दिवसांत भाविकांकडून कोटी रुपयांची देणगी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ ।  तुळजापूरच्या आई तुळजाभवानी देवस्थानास यंदाच्या नवरात्रोत्सवात घटस्थापना ते आश्विन पोर्णिमा यात्रा या १५ दिवसांतच तुळजापूरच्या उत्पन्नात विक्रमी साडेपाच कोटींची भर पडली आहे. यात सर्वाधिक २ कोटी ८६ हजार रुपये व्हीआयपी व सशुल्क दर्शनातून मिळाले आहेत.

कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच सण निर्बंधमुक्त साजरे केले जात आहेत. नवरात्र महोत्सवात या वर्षी विक्रमी संख्येने भाविकांनी हजेरी लावली. तब्बल दोन वर्षांनंतर कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन होत असल्याने भाविकांत प्रचंड उत्साह होता. विशेष म्हणजे नवरात्रापूर्वी व नवरात्रीनंतर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने नवरात्र तसेच आश्विन पौर्णिमेला उसंत घेतली होती. भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या दानपेटीत भरभरून दान टाकले. परिणामी केवळ १५ दिवसांत उत्पन्नात ५ कोटी ४७ लाख ५२ हजार रुपयांची भर पडली होती. सर्वाधिक उत्पन्न व्हीआयपी, सशुल्क दर्शनातून : नवरात्र महोत्सवात धर्मदर्शनाला ४ ते ५ तासांचा कालावधी लागत होता. परिणामी भाविकांनी ३०० रुपये मोजून सशुल्क दर्शन घेण्यास पसंती दिली. याशिवाय नवरात्र महोत्सवात ५०० रुपयांच्या व्हीआयपी दर्शनाला भाविकांची झुंबड उडाली होती.

मंदिर संस्थानला मिळालेले उत्पन्न व्हीआयपी व सशुल्क दर्शन २ कोटी ८६ हजार सिंहासन पेटी १ कोटी ४१ लाख १२ हजार दानपेटी ८२ लाख ३१ हजार विश्वस्त निधी २२ लाख २१ हजार ऑनलाइन देणगी दर्शन/भोगी ४ लाख ४४ हजार नारळ विक्री ३ लाख ३३ हजार मनीऑर्डर २ लाख ८७ हजार चेकद्वारे देणगी १ लाख २० हजार यूपीआय कार्ड स्कॅनद्वारे देणगी ५१ हजार लिलावाद्वारे मिळाले ६२ लाख मंदिरातील होम कुंडाचा ३ वर्षांसाठी लिलाव करण्यात आला आहे. याद्वारे ५४ लाख ४६ हजार रुपये मंदिर संस्थानला प्राप्त झाले आहेत. याशिवाय उस्मानाबाद रोडवरील तुळजा विश्रामधाम ३ लाख ५० हजार व शिधा ५ लाख असे एकूण ६२ लाख ९६ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी यात्रा झाली होती रद्द गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर २०२१ घटस्थापनेच्या दिवशी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. घटस्थापना ते दसरा या नवरात्रीच्या नऊ दिवसांत (७ ते १५ ऑक्टोबर) तुळजाभवानी मातेच्या दानपेटीत २ कोटी १६ लाख १ हजार ४९५ रुपयांची भर पडली होती. गेल्या वर्षी आश्विन पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम