मोदींना आता गोरगरीब मराठा समाजाची गरज नाही ; मनोज जरांगे पाटील !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ ऑक्टोबर २०२३

गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे उपोषण सुरू आहे. आज पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आणखी आक्रमक भूमिका घेतली. मराठा आरक्षणावर मोदी बोलले नाहीत, यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मनोज जरांगे म्हणाले, मराठा नेत्यांनी समाजाची फसवणूक केली म्हणून आम्ही त्यांना गावबंदी केली आहे. तरीही आम्ही मोदींना शिर्डीत येऊ दिले.

मनोज जरांगे म्हणाले, मोदी महाराष्ट्रात येऊन मराठा आरक्षणावर बोलतील अशी आमची अपेक्षा होती. अवघ्या देशात मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे, त्याची दखल घेतली जात आहे. तरीही मोदी काल मराठा आरक्षणावर का बोलले नाहीत. यावर दोनच शक्यता आहे. एक तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी मोदींना आरक्षणाबाबत सांगितलेच नसेल, अशी आम्हाला शंका आहे.मनोज जरांगे म्हणाले, दुसरी शंका आम्हाला अशी आहे की कदाचित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोदींना मराठा आरक्षणाबाबत सांगितले असेल, तरीही मोदी जाणूनबुजून मराठा आरक्षणावर बोलले नसतील. याचा स्पष्ट अर्थ आहे की, मोदींना आता गोरगरीब मराठा समाजाची गरज नाही. मोदींबद्दल माझे जे काही विचार होते ते चुकीचे होते. पण, मोदींच्या न बोलन्याने आम्लाहा आरक्षण मिळणे काही थांबणार नाही. कोणत्याही स्थितीत आम्ही आरक्षण मिळवूनच राहू.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम